महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकावर मद्य माफियांचा प्राणघातक हल्ला; दोघे ताब्यात - attack on state excise squad in solapur

गुरुवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क पथकाने मोठी कारवाई करत गोव्यात निर्मिती केलेला मद्यसाठा जप्त केला. या कारवाई मध्ये 8 लाख 84 हजारांच्या विदेशी दारूचे 25 बॉक्स हस्तगत करण्यात आले.

illegal liquor selling in solpaur
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकावर मद्य माफियांचा प्राणघातक हल्ला; दोघे ताब्यात

By

Published : Oct 10, 2020, 7:57 AM IST

सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क पथकावर कारवाई दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मद्य तस्करांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

गुरुवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क पथकाने मोठी कारवाई करत गोव्यात निर्मिती केलेला मद्यसाठा जप्त केला. या कारवाई मध्ये 8 लाख 84 हजारांच्या विदेशी दारूचे 25 बॉक्स हस्तगत करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन मद्य माफियांचा यामध्ये मुख्यत्वे सहभाग असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या भरारी पथकाने मंद्रुप कंदलगाव या मार्गावर पकडलेला माल जप्त करून मद्य माफिया रोहित खुने व मुन्ना खुने यांना अटक करण्यासाठी उस्मानाबादकडे मोर्चा वळवला. यानंतर एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोघेही तुळजापुरात लपल्याचे स्पष्ट झाले.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ताबडतोब आपला मोर्चा तुळजापूर येथे वळवला आणि कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पण दबा धरून बसलेल्या या मद्य माफियांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर चारचाकी चढवल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना किरकोळ जखम झाल्याची माहिती समोर आली.

रोहित खुने व मुन्ना खुने हे दोघे सराईत मद्य तस्करी करणारे असल्याची तक्रार तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्याविरोधात सरकारी कामात अडथळा(भा. द. वि.353), प्राणघातक हल्ला(भा. द. वि.307) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे मद्य तस्कर तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details