पंढरपूर(सोलापुर)- पंढरपुरात कोरोना रुग्णांची संख्या 88 वर पोहोचली आहे. बुधवारी 24 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंढरपूर शहर आणि तालुक्यात लॉकडाऊन करण्याची मागणी वाढत आहे.
पंढरपुरात कोरोनाचा वाढता कहर; 24 कोरोना रुग्ण वाढले - कोरोना वायरस केसेस इन पंढरपूर
पंढरपूरमध्ये बुधवारी 24 कोरोना रुग्ण वाढल्याने रुग्ण संख्या 88 वर पोहोचली. सध्या 57 रुग्णांवर उपचार सुरु असून 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांत 50 पेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.कोरोनामुळे पंढरपुरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 57 जणांवर उपचार चालू असून 29 जण बरे होऊन घरी गेले आहे. कोरोनाबाधितांमध्ये 60 जण शहरी भागातील तर 28 जण ग्रामीण भागातील आहेत.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रदक्षिणा मार्गावर, नवी पेठ, जुनी पेठ, लिंक रोड, गणेश नगर, भक्ती मार्ग, कराड नाका, रुक्मिणी नगर, सांगोला चौक, महापौर चाळ, संत पेठ, करकंब, गोपाळपूर या गाव भागात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.