सोलापूर : सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू झाला आहे. 15 ऑक्टोबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले असून. अनेक ऊसतोडणी मजूर आपल्या गावाकडून पश्चिम महाराष्ट्रात येत ( truck carrying sugarcane workers overturned ) आहेत. काल रात्री सव्वादोन वाजता ऊसतोडणी कामगारांना घेऊन जाणारा MH 12 FC 9829 एक ट्रक सोनके तालुका पंढरपूर येथे पलटी झाला ( Truck overturned at Pandharpur ) आहे. या झालेल्या अपघातामध्ये एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Truck overturned at Pandharpur : ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, एका बैलाचा मृत्यू - One bull died in accident
सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू झाला आहे. 15 ऑक्टोबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले असून. अनेक ऊसतोडणी मजूर आपल्या गावाकडून पश्चिम महाराष्ट्रात येत ( truck carrying sugarcane workers overturned ) आहेत.
ड्रायव्हरने पळ काढला :अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. ट्रक ड्रायव्हर मद्यधुंदीत गाडी चालवत होता असं प्रत्यक्ष दर्शींकडून सांगण्यात येत आहे. या झालेल्या अपघातामुळे काही काळ या परिसरात तणावाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. या अपघातात एक बैल गंभीर जखमी झाला ( One bull died in accident ) आहे. बीडवरून हा ट्रक राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली . या ट्रकमध्ये एकूण नऊ माणसे होती, ती माणसे ट्रकच्या केबिनमध्ये बसली असल्यामुळे सुदैवाने त्यांच्यासोबत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
जखमींवर उपचार :अपघात झाल्यानंतर परिसरामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला तेव्हा स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जखमींना बाहेर काढून त्यांना प्रथामोपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल केले.