सोलापूर - शहरातील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ११ जण जखमी झाले असून, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात अपघात झालेली बस (क्रमांक ०१९९) ही हैदराबादकडून पंढरपूरकडे जात होती. यावेळी सोलापूर विद्यापीठासमोर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला (के. ए. ३९, ४४६९) बसने मागून जोराची धडक दिली. ही ट्रक बॅटरीने भरलेली असल्याने बॅटऱ्यांचा स्फोट झाला आणि त्यातूनच बसनेही पेट घेतला. यानंतर बसमधील अपघातग्रस्त प्रवाशांना स्थानिक नागरिक व काही युवकांच्या मदतीने शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच ४ अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. बसच्या चालक आणि वाहकावर शासकीय रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर ९ जणांना अश्विनी सहकारी रुग्णालयात आणि एकाला मार्कंडेय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अधिक तपास पोलीस करत आहेत.
जखमींची नावे
१. अस्लम महेबूब सलगर (वय २७, रा. चारमिनार, हैदराबाद)
२. अजमेर रामय्या भिक्कु (वय ३२, रा. हैदराबाद)
३. यादय्या रामलू गोपीन (वय ४७, रा. रवी चेडू केसम पेठ, महेबूब अपार्टमेंट, हैदराबाद)
४. रणधीरसिंग मनोहरसिंग दीक्षित ( वय ४८, रा. वायएमसीए नारायण गुडा, हैदराबाद)
५. अस्लम सय्यद (वय ३५, रा. तलाफ कट्टा, हैदराबाद)
६. नारायणसिंग राजपूत (रा. बीएचईएल, हैदराबाद)
७. मीना राजपूत