महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मृत मुलाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अस्थींवर वृक्षारोपण - Tree Planting News

उत्तर सोलापूरमधील वडाळा गावातील पोपट गणपत साठे यांचा मुलगा संजय साठे यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या अस्थीवर चिंचेचे रोप लावण्यात आले.

tree-planted-on-the-bones-to-brighten-the-memory-of-the-dead-child
मृत मुलाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अस्थींवर वृक्षारोपण

By

Published : Dec 11, 2019, 11:38 PM IST

सोलापूर : उत्तर सोलापूरमधील वडाळा गावातील पोपट साठे यांचा मुलगा संजय साठे यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. याच तरुण मुलाच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून तरुण मुलाच्या अस्थिचे रक्षाविसर्जन नदीत न करता आपल्या स्वतःच्या शेतात करत त्या अस्थिवर चिंचेचे रोप लावून नवा आदर्श घालून दिला.

मृत मुलाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अस्थींवर वृक्षारोपण

हेही वाचा -हौसेला मोल नसते; शेतकऱ्याने आपल्या नवरी मुलीची हेलिकॉप्टरमधून केली पाठवणी

या कार्यासाठी पोपट साठे यांना त्यांच्या सून संध्या संजय साठे, नातू संदीप संजय साठे, नात पूजा संजय साठे या सर्वांनी संमती दिली. शिवाय दीडशे वर्षे आयुष्यमान असलेल्या चिंचेच्या झाडाचे रोप लावले. ज्यामुळे ते पुढच्या दोन पिढ्या मृत संजय साठेंच्या स्मृतींना उजाळा देत राहील. यानिमित्ताने जुन्या पिढीतल्या जाणकारांनी आधुनिक विचारांची कास धरत पर्यावरण रक्षणाबरोबरच अंधश्रद्धेला मूठमाती दिलीय.

हेही वाचा-पाणी फाउंडेशनच्या कामाची कमाल..! दुष्काळी भागातील हातपंपातून न हापसता येतंय पाणी

ABOUT THE AUTHOR

...view details