सोलापूर Solapur Maratha Reservation: सोलापूर शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीचा उद्रेक पाहावयास मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून जाणाऱ्या रेल्वेरुळावर जाऊन मराठा आरक्षणासाठी रेल्वेरोको आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी रेल्वे रोको करत असल्याचं मराठा बांधवानी सांगितलं. मालवाहतूक करणारी रेल्वे अचानकपणे रोखून जोरदार घोषणाबाजी करण्यात (Rail Roko Andolan) आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) राम जाधव, प्रकाश भोसलेसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे रोको करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे (Faujdar Chavadi Police Station) पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिदसह पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
सोलापुरात केलं रेल्वे रोको: मराठा आरक्षण आंदोलनाची धग सोलापूर शहर व जिल्ह्यात दिसून येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहराजवळ असलेल्या शेटे वस्तीजवळ असलेल्या रेल्वे रुळावर अचानकपणे आंदोलन करण्यास सुरुवात केली. मालवाहतूक रेल्वे त्या ठिकाणाहून जात असताना, मराठा समाज बांधवानी रेल्वे मालवाहतूक ट्रेन रोखून धरली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली.