सोलापूर- आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. गुरुवारी हाच दर १० हजाराच्या पुढे होता. मात्र, आज सोलापुरात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडले असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ७०० ट्रकांपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली. गुरुवारी सोलापुरात कांद्याला देशातील सर्वाधिक दर मिळालाच्या बातम्या सर्वच माध्यमात आल्या.