सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कांदा लिलाव बंद पाडले आहेत. बाजार समितीमध्ये 250 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना ऐनवेळी व्यापाऱ्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ घातला.
सोलापुरात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद; दर पाडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा आरोप - सोलापुर कांदा लिलाव
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने बुधवारी रात्रीपासून बाजार समितीच्या आवारात शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे कारण पुढे करत सकाळी तीन तास लिलाव पुकारले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घातला.
हेही वाचा -'मी आणि माझं कुटुंब कांदा खातच नाही...' कांदा दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं अजब उत्तर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने बुधवारी रात्रीपासून बाजार समितीच्या आवारात शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे कारण पुढे करत सकाळी तीन तास लिलाव पुकारले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घातला. कांद्याचे दर पाडण्यासाठी व्यापारी असे करत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी बाजार समितीकडून कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.