महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उसाच्या ट्रॅलीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू, बार्शी-उस्मानाबाद मार्गावरील घटना - Pandharpur Latest News

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दशरथ त्रिबंक शिंदे (वय 49 रा.बार्शी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. बार्शी-उस्मानाबाद मार्गावर चिखर्डे परिसरात हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tractor-two-wheeler accident
उसाच्या ट्रॅलीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

By

Published : Dec 22, 2020, 5:14 PM IST

पंढरपूर -ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दशरथ त्रिबंक शिंदे (वय 49 रा.बार्शी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. बार्शी-उस्मानाबाद मार्गावर चिखर्डे परिसरात हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन कोंढारे असे या चालकाचे नाव आहे.

चालका विरोधात गुन्हा दाखल

मृत दशरथ शिंदे हे बार्शीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते, त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास लखन शिंदे, अनिल बारंगुळे व दशरथ शिंदे असे तिघे जण फवारणीसाठी लागणारे औषध आणण्यासाठी नारी येथून बार्शीकडे निघाले होते. लखन शिंदे व अनिल बारंगुळे हे एका दुचाकीवर होते, तर दशरथ शिंदे हे एकटे एका दुसऱ्या दुचाकीवर होते. यावेळी त्यांची दुचाकी चिखर्डे परिसरात आली असता, ते रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅलीला धडकले या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details