महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार उद्या ठरणार - पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक बातमी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल व मतमोजणी उद्या (2 मे) शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्या पासून सुरू होणार आहे. 14 टेबलांवर 38 फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत.

ईव्हीएम
ईव्हीएम

By

Published : May 1, 2021, 5:24 PM IST

Updated : May 1, 2021, 5:38 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल व मतमोजणी उद्या (2 मे) शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्या पासून सुरू होणार आहे. 14 टेबलांवर 38 फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाची मोजणी दोन टेबल होणार आहे. यासाठी दोन टेबल राखीव ठेवण्यात आले आहे तर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके, भारतीय जनता पक्षाकडून समाधान आवताडे यामध्ये प्रमुख लढत असणार आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैलजा गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 जण रिंगणात आहे. यातून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार ठरणार आहे.

माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी

प्रशासन यंत्रणा सज्ज

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले आहे. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले असून, मतमोजणीसाठी 118 अधिकारी , कर्मचारी व मदतनीस यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

प्रतिनिधींनी तसेच इतरांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक

मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच इतरांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी कोरोना चाचणी केली नाही अशांसाठी मतदान कक्षाबाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाईल. तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्यासच त्यांना मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता मतमोजणी कक्षा बाहेरील क्षेत्रात फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी, निवडणूक निकाल ध्वनीक्षेपकाव्दारे जाहीर करण्यात येणार नाही. तो फक्त मतमोजणी कक्षात जाहीर करण्यात येईल. फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकाल सोलापूर आकाशवाणी केंद्रावरुन वेळोवेळी प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकालासाठी वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुनही पाहता येईल.

पंढरपूर शहर व तालुक्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था

मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यानुसार मतमोजणीवर नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रिकरणही करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोबाइल वापरण्यास बंदी आहे. मतमोजणीच्या दिवशी अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतमोजणी केंद्रात आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. यासाठी आरोग्य सुविधा कक्ष, प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष, तसेच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दल तैनात करण्यात आले असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले.

हेही वाचा -करकंबमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सज्ज

Last Updated : May 1, 2021, 5:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details