सोलापूर -जिल्ह्याला आज (शनिवार) अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारादेखील पडल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, काही भागात वादळी वाऱ्यासह गारा - सोलापूर अवकाळी पाऊस
सोलापूर जिल्ह्याला आज (शनिवार) अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.
सोलापूर जिल्ह्यालाअवकाळी पावसाने झोडपले
सोलापूर जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारादेखील पडल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या पावसाचा अंदार वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब, अरण तसेच पंढरपूर तालुक्यातील भोसे परिसरात गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान होणार आहे.