महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमित शाह यांचा सोलापूर दौरा, मोकाट जनावरे पकडली, अतिक्रमणे काढली - महापालिकेच्या अतिक्रमण पथक

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा सोलापूर दौरा चांगलाच गाजत आहे. विमानतळ ते पार्क चौक या दरम्यान मोकाट जनावरे आणि गाढवे पकडली जात आहेत.

सोलापूर पालिकेने मोकाट जनावरे पकडली

By

Published : Sep 1, 2019, 4:40 PM IST

Updated : Sep 1, 2019, 5:05 PM IST

सोलापूर - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा सोलापूर दौरा चांगलाच गाजत आहे. विमानतळ ते पार्क चौक या दरम्यान मोकाट जनावरे आणि गाढवे पकडली जात आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेले फलक पालिकेच्या अतिक्रमण विभागाने फाडून टाकले आहेत. तसेच पार्क चौपाटीवरील अनेक भेळच्या गाड्यादेखील हलविण्यात आल्या आहेत.

अमित शाह आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी सोलापुरात महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विनापरवाना डिजिटल बोर्ड लावले असून, महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने ते काढून टाकले आहेत. मात्र, पुन्हा चार पुतळा, पार्क चौक, सात रस्ता याठिकाणी हे डिजिटल लावल्याने ते मनपाने फाडून टाकले आहेत.

अमित शाह यांचा सोलापूर दौरा, मोकाट जनावरे पकडली

एकूणच सभा सुरु होण्यासाठी अवघा काही तासाचा अवधी असल्यामुळे पोलीस यंत्रणा वाढविण्यात आली आहे. पार्क मैदानावर चिखल झाल्याने रस्ता करण्यात आला आहे. तर 50 मेटल डिटेक्टरमधून तपासणीकरुन नागरिकांना सोडले जाणार आहे. पार्क मैदान तसेच शासकीय विश्रामगृहाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. विमानतळ ते पार्क चौक आणि संभाजी पुतळा ते पार्क चौक या मार्गावर सतत पोलीस गाड्या धावत असल्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचा सोलापुरात मुक्काम असल्यामुळे पोलीस प्रशासन देखील तणावाखाली आहे.

Last Updated : Sep 1, 2019, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details