महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचा २४वा बळी, १३ नवे रुग्ण आढळल्याने एकूण आकडा ३४३वर - सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्ण संख्या

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३४३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात यात १३ रुग्णांची भर पडली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

today 2 deaths in solapur due to coronavirus 13 new positive case register
सोलापूरात कोरोनाचा २४ वा बळी, 13 नवे रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 343 वर

By

Published : May 15, 2020, 8:09 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३४३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात यात १३ रुग्णांची भर पडली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज एकूण १०५ रूग्णांचे अहवाल आले आहेत. यातील १३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे तर ९२ अहवाल हे निगेटिव्ह आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या १३ जणांपैकी ८ पुरूष आणि ५ स्त्रीयांचा समावेश आहे. कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात आजघडीपर्यंत ११३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनामुळे आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय रुग्णालयाजवळील ६३ वर्षाच्या वयोवृद्धाचा समावेश आहे. तर दुसरा मृत व्यक्ती शास्त्री नगर परिसरातील ५८ वर्षीय पुरूष आहे.

सोलापूरात आतापर्यंत ३८३३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५८६ रूग्णांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर ३४३ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. अजून २४७ रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.


हेही वाचा -परप्रांतीय मजुरांचा संयम सुटला, गावी जाण्यासाठी लहानग्यांसह पायपीट सुरू

हेही वाचा -कोरोना पॉझिटिव्ह दोन चिमुकल्यांचा वाढदिवस डॉक्टरांनी केला साजरा

ABOUT THE AUTHOR

...view details