पंढरपूर:पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचे सर्व टायर्स अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना समोर आली आहे. काल बुधवार (दि. २६ ऑक्टोबर)रोजीसायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या Solapur District Sugarcane Rate Struggle Committee वतीने उसाला 2500 रुपये पहिली उचल द्यावी, आणि 3100 रुपये अंतिम हप्ता द्यावा, ही मागणी करत, संघर्ष समितीने ऊस परिषद घेतली आहे.
ऊस दरावरून आंदोलनाची ठिणगी; वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले - Solapur District Sugarcane Rate Struggle Committee
Solapur News: काल सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचे सर्व टायर्स अज्ञात व्यक्तीने फोडले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या Solapur District Sugarcane Rate Struggle Committee वतीने उसाला 2500 रुपये पहिली उचल द्यावी, आणि 3100 रुपये अंतिम हप्ता द्यावा, ही प्रमुख मागणी घेत संघर्ष समितीने ऊस परिषद घेतली होती.
आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार: मागील दोन ते तीन दिवसापासून संघर्ष समितीचे पदाधिकारी ऊस वाहतूकदारांना हात जोडून विनंती करून, गांधीगीरी करत वाहतूकदारांचे सत्कार करून, ऊस वाहतूक न करण्याबाबत आवाहन करत होते. जोपर्यंत कारखानदार उसाचा दर जाहीर करत नाही, तोपर्यंत ऊस तोडणी बंद करण्याचे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांना आणि करण्यात येत होते. दरम्यान दोन दिवस दीपावली असल्यामुळे संघर्ष समितीकडून दीपावलीनंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. कालच दिवाळी पाडवा व भाऊबीजेने दीपावलीची सांगता झाली.
अडीच लाखांचे नुकसान: काल रात्री 8:30 वाजता श्रीपुर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे चळे येथून ऊस घेऊन जाणारा चाळीसगाव येथील दादा लिंबा पाटील यांचा ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तींनी फोडला आहे. या ट्रॅक्टरचे सर्व टायर्स फोडले असून यामुळे संबंधित ट्रॅक्टर चालकाचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यात ऊस आंदोलनाचा भडका उडाला असल्याचीही चर्चा आता सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.