पंढरपूर (सोलापूर) -सांगोला तालुक्यातील सोनंद गावाजवळ ट्रक आणि बुलेट समोरासमोर धडक ( Accident in track and bike at sangola ) झाल्यामुळे बुलेट वरील तीन युवक जागीच ठार झाल्याची ( Accident In Solapur ) घटना घडली आहे. सोनंद इथून देव दर्शन करून परत येणाऱ्या अक्षय मलपे, शरद गजले आणि आदिनाथ मंडले (रा. खर्डी ता. पंढरपूर) असे मृत झालेल्या युवकाचे नाव ( Three youths died in accident solapur ) आहे. सणा दिवशी झालेल्या घटनेमुळे गावावर खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.
ट्रक आणि बुलेटमध्ये भीषण अपघात-
सांगोला तालुक्यातील सोनंद गावाजवळ यल्लमा देवीच्या दर्शनासाठी अक्षय मलपे, शरद गजले आणि आदिनाथ मंडले हे बुलेट वरून तिघेजण गेले होते. मात्र सोनंद गावाजवळून बाहेर पडले असता. पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक व खर्डी च्या दिशेने जाणाऱ्या बुलेटच समोरासमोर धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बुलेटचा चुरा झाला होता.