महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur Textile Factory Blast: सोलापूर टेक्सटाईल कारखान्यात पहाटे भीषण स्फोट; तीन कामगारांचा भाजून मृत्यू

आज पहाटेच्या सुमारास सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसीमधील एका टेक्सटाईल कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत तीन कामगारांचा भाजून मृत्यू झाला आहे.

Solapur Textile Factory Blast
सोलापूर टेक्सटाईल कारखान्यात स्फोट

By

Published : Jul 5, 2023, 11:36 AM IST

Updated : Jul 5, 2023, 11:44 AM IST

सोलापूर टेक्सटाईल कारखान्यात कामगारांचा भाजून मृत्यू

सोलापूर : सोलापूर टेक्सटाईल कारखान्यात पहाटे भीषण स्फोट झाला. त्यामुळे कारखान्याला आग लागली. अक्कलकोट एमआयडीसीमधील सीता रुपम असे टेक्सटाईल कारखान्याचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास आठ गाड्या पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली आहे. तीन कामगारांचा आगीत मृत्यू झाल्याने सोलापुरातील पोलीस प्रशासन ताबडतोब एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतलली आहे.

गॅस सिलेंडरचा स्फोट :पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे. मृत झालेल्यांमध्ये मनोज देहुरी, आनंद बगदी, सोहादेव बगदी या तिन्ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी केदार आवटे यांनी माहिती देताना सांगितले, पहाटेच्या सुमारास जवळपास पाच कामगारांना गॅसवर काही तरी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. दोन कामगार आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण आगीचा भडका उडाला होता.

कामगारांचा साखर झोपेत होरपळून मृत्यू :रुपम या टेक्सटाईल कारखान्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. सुतांचे बंडल, टॉवेल असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. कारखान्यातच साखर झोपेत असलेल्या कामगारांना काही कळण्याअगोदर आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती. कारखान्यात काही कामगार हे राहावयास आहे, त्या ठिकाणी असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जवळपास 8 गाड्या पाण्याचा फवारा करत, आग आटोक्यात आणली आहे. साखर झोपेत असलेल्या तीन कामगारांना झोपेतच मृत्यूने कवटाळून घेतले आहे.

मृत झालेले कामगार परप्रांतीय :एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णसेवक म्हणून काम करणारे जहांगीर शेख यांनी भाजलेल्या तिन्ही मृतदेहाना शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले आहे. एमआयडीसी पोलिसांना याबाबत अधिक माहिती विचारली असता, मृत कामगारांची परप्रांतीय आहेत. त्यांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. रूपम विव्हिंग मिल असे कारखान्याचे नाव आहे. शशिकांत मोहन सीता असे कारखान्याचे मालक आहेत. पोलीस तपास सुरू आहे.



हेही वाचा :

  1. Blast In Firecracker Factory मेरठमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, एकाचा मृत्यू
  2. Blast In Chapra : छपरा येथे स्फोटात 6 ठार, बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी दाखल
  3. Muzaffarpur Factory Blast : मुझफ्फरपूरमध्ये कुरकुरे नूडल्स कारखान्यात स्फोट; 10 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
Last Updated : Jul 5, 2023, 11:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details