महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना तीन हजार महिलांनी बांधल्या राख्या - भाजप रक्षाबंधन कार्यक्रम सोलापूर

शहरातील जाम गुंडी मंगल कार्यालयात राखी पौर्णिमेनिमित्त भाजपकडून 'रक्षाबंधन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मतदारसंघातील तीन हजार महिलांनी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हातावर राखी बांधली.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना तीन हजार महिलांनी बांधल्या राख्या

By

Published : Aug 18, 2019, 8:05 PM IST

सोलापूर -शहरातील जाम गुंडी मंगल कार्यालयात राखी पौर्णिमेनिमित्त भाजपकडून 'रक्षाबंधन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मतदारसंघातील तीन हजार महिलांनी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हातावर राखी बांधली. तर,ओवाळणी म्हणून या महिलांना माहेरचे वाण आणि साडी भेट देण्यात आली.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना तीन हजार महिलांनी बांधल्या राख्या

सोलापुरातील विडी उद्योग धोक्यात असल्याने महिलांना नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात सौरऊर्जेवर चालणारा चरखा देण्याचे आश्वासनही देशमुख यांनी कार्यक्रमात दिले. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

सांगली आणि कोल्हापूर दोन जिल्ह्यांमधील दोन पूरग्रस्त गावे सोलापूरकरांनी सर्वांगीण मदतीसाठी दत्तक घेतल्याची माहितीदेखील देशमुख यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details