सोलापूर - पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले असून 13 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात अपघातग्रस्त रुग्णवाहिका मृतदेह घेऊन तेलंगाणा राज्यात जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सहा जण रुग्णवाहिकेतून पुण्याहून ते हैद्राबादला जात होते. आज पहाटे 3 वाजता भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाला ताबा सुटला आणि समोर जाणाऱ्या ट्रकला धडकली. यामध्ये रवी माणिक राठोड (वय 38 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे), बुद्धीबाई चण्णा पाळत्या (वय 48 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे) आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
हेही वाचा -सालेकसा पोलिसांच्या वाहनाला अपघात; पोलीस शिपायाचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी
रुग्णवाहिकेचा चक्काचूर -
या भीषण अपघातात रुग्णवाहिकेचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. गोपाळ धनसिंग राठोड (वय 45), गणेश धनसिंग राठोड, रामलु धनसिंग राठोड, राम सोमनाथ राठोड (वय 34), आशा सुभाष राठोड (वय 40 वर्ष), लोकेश धनसिंग राठोड, किसन रामलु राठोड, रवी गोपाळ राठोड, रमेश रावजी राठोड, किसन नारायण राठोड, अनुशा खाद्रवल सर्व जखमी माळवाडी, वारजे पुणे येथील रहिवासी आहेत. पहाटेच्या सुमारास या सर्व जखमींना सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मृतदेह घेऊन तेलंगणा येथे निघाले होते -
एकाच कुटुंबातील 13 जण जखमी झाले आहेत व 3 ठार झाले आहेत. मृतदेह घेऊन पुणे येथून तेलंगाणा येथे जात असताना मोहोळ येथील कन्या प्रशालेजवळ हा अपघात घडला आहे.
हेही वाचा-गोव्याकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली, पाच जणांचा मृत्यू तर सहा गंभीर