महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरातील तीन दवाखाने 'डेडीकेटेड' हॉस्पिटल घोषित - solapur covid 19 situtuion

सोलापूर जिल्ह्यातील तीन दवाखाने शासनास समर्पित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी (डीसीएच) खाटांची संख्या कमी पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

solapur covid 19
सोलापुरातील तीन दवाखाने 'डेडीकेटेड' हॉस्पिटल घोषित

By

Published : Jul 4, 2020, 12:01 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तीन दवाखाने डेडीकेटेड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. वाढत्या रुग्णांना खाटांची संख्या कमी पडू नये म्हणून, खासगी दवाखाने डेडीकेटेड (समर्पीत) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकलूज, कुंभारी आणि बार्शीतील तीन दवाखाने आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तीन दवाखाने शासनास समर्पित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी (डीसीएच) खाटांची संख्या कमी पडू नये, यासाठी राणे हॉस्पिटल (अकलूज) येथील 50 खाटा, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय(कुंभारी) तेथील 100 खाटा, आणि बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटल (50 खाटा). या दवाखान्याची इमारत, परिसर, मनुष्यबळ, जीरक्षक प्रणालीसह आवश्यक साधन सामग्रीचा ताबा जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात येणार असल्याचा आदेशात उल्लेख करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details