पंढरपूर - वेळापूर (ता. माळशिरस) येथील चौकात पुणे-पंढरपूर रस्त्याचे काम करत असलेल्या टिप्परची व मोटरसायकलची धडक झाली. या धडकेत तिघा जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणात वेळापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कॉन्स्टेबल विशाल साठे संशयाच्या भोवर्यात अडकले आहे. मृतांच्या नातेवाईकांनी कॉन्स्टेबल साठे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात काहीवेळ आंदोलन करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
वेळापूर येथे टिप्पर व मोटरसायकलची धडक, तीन जण ठार पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून तुषार शहाजी जाधव (वय 18) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, देवा बाबासाहेब माने (वय 28) या तरुणाचा उपचारांसाठी नेताना मृत्यू झाला. तर, तिसरा तरुण धनंजय संजय माने (वय 17) गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याचाही अकलूज येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन वर्षांपूर्वी एका खुनाच्या प्रकरणामध्ये देवा बाळासाहेब माने याला संशयित आरोपी म्हणून वेळापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर माळशिरस तालुका हद्दपारीची नोटीसही बजावण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी वेळापूर येथील उघडे चौकात प्रत्यक्षदर्शी नातेवाइकांच्या मते, एका पोलीस कर्मचाऱ्याने मोटारसायकलवरून केलेल्या पाठलागामुळे या तरुणांचा अपघात होऊन ते टिप्परखाली आले. संतप्त नातेवाइकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या निषेधार्थ आणि अटकेसाठी घटनास्थळी मृतदेहाभोवती कडे करून रस्ता रोखून धरला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली.
हेही वाचा -पुलगाव येथे फोटो काढण्याचा नाद बेतला जिवावर; १८ वर्षीय मुलाचा मृत्यू
संतप्त नातेवाइकांच्या जमावाने वेळापूर पोलीस ठाण्यात येऊन अपघातग्रस्त तरुणांचा विनागणवेश पाठलाग करणाऱ्या पोलीस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांच्या मते, पोलीस कॉस्टबल साठे देवा माने यास धमकावून पैशाची मागणी करत होते. त्यावेळी देवा माने याच्यासह दोघा जणांनी मोटरसायकलवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात ते पुणे-पंढरपूर रस्त्यावरून जाणाऱ्या टिप्परखाली आल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी हा अपघात म्हणजे संगनमताने केलेला कट असल्याचा आरोपही केला आहे. यामुळे वेळापूर पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मृतांच्या नातेवाईकांनी वेळापूर पोलीस ठाण्यासमोर अकलूज-सांगोला रस्त्यावर जमावाने ठिय्या आंदोलन करत पोलीस प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व अकलूज विभागीय पोलीस अधिकारी धीरज राजगुरू यांनी नातेवाईकांची समजूत काढून हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले. विभागीय पोलीस अधिकारी धीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल साठे यांच्याविरुद्धच्या प्रकरणाची सात दिवसांमध्ये चौकशी करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिले. डंपर चालकाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -चारचाकी नाल्यात पडल्याने महिलेचा मृत्यू ; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात