महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रक-रिक्षाच्या भीषण अपघातात तीन ठार, चार जण गंभीर जखमी - पंढरपूरमध्ये ट्रक - रिक्षाचा भिषण अपघात

पंढरपूर -मोहोळ मार्गावर गोसावीवाडी परिसरात शनिवारी ट्रक व रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

पंढरपूरमध्ये ट्रक - रिक्षाचा भिषण अपघात
Three Dead in accident Pandharpur

By

Published : Nov 7, 2020, 9:20 PM IST

पंढरपूर-पंढरपूर -मोहोळ मार्गावर गोसावीवाडी परिसरात शनिवारी ट्रक व रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. ट्रक आणि रिक्षाचा समोरासमोर अपघात झाला. पंढरपूरहून येणाऱ्या भरधाव ट्रकने पंढरपूरकडे जाणाऱ्या रिक्षाला समोरून धडक दिली. यामध्ये रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे नाव संदीप कुमार कोळी असे आहे. तर अन्य दोघांची नावे समजू शकलेली नाहीत.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरहून मोहोळकडे निघालेला ट्रक (एमएच 13 सीयू 5466) आणि मोहोळच्या बाजूने पंढरपूरकडे येणाऱ्या रिक्षाची (एमएच 13 एडी 893) समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहने वेगात असल्यामुळे झालेल्या या भीषण अपघातात रिक्षामधून प्रवास करणाऱ्या सात जणांपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details