देवेंद्र फडणवीस बारामतीत, तर पंढरपुरात प्रवीण दरेकर - devendra fadnvis news
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आजपासून तीन दिवसांच्या अतिवृष्टी झालेल्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीपासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि सोलापूरचा दौरा करतील. बारामतीपासून सुरुवात करुन कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परांडा या ठिकाणी पाहणी करुन उस्मानाबादकडे रवाना होतील.
सोलापूर (पंढरपूर)- कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले घास हिरावून घेण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आजपासून तीन दिवसांच्या अतिवृष्टी झालेल्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीपासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि सोलापूरचा दौरा करतील. बारामतीपासून सुरुवात करुन कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परांडा या ठिकाणी पाहणी करुन उस्मानाबादकडे रवाना होतील.
तर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सायंकाळी ४ वाजता सोलापूर जिल्हायातील भंडीशेवगाव येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तेथील शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी पंढरपूर येथील कुंभारघाटाजवळील भिंत कोसळून झालेल्या अपघातस्थळाची देखील पहाणी करतील, तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांची सात्वंनपर भेट घेणार आहेत. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर २० ऑक्टोबर रोजी सोलापूर व सांगलीतील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर २० ऑक्टोबर रोजी सोलापूर व सांगली मधील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. अक्कलकोट येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दरेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.