सोलापूर- शहरांमध्ये कोरोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रामुख्याने सिंहगड महाविद्यालय, म्हाडा बिल्डींग, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, वाडिया रुग्णालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव, सोलापूर विद्यापीठ, भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रूग्णांना आता कोविड केअर सेंटरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मांसाहार जेवण आणि रोज अंडी मिळणार आहेत.
बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्तांनी भेटीनंतर दिला आदेश
सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निर्देशांने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोविड व क्वारंटाईन सेंटर येथे जेवण देणाऱ्या नव्याने नियुक्त करण्यात आलेला मक्तेदारांच्या किचन तपासणीसाठी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी त्या ठिकाणी भेट दिली. भेट देऊन जेवणाची तपासणी, स्वच्छता जेवणाचे प्रमाण आदींची तपासणी करून नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या मक्तेदारांना यापुढे कोविड सेंटर व क्वारंटाईन सेंटर येथील रुग्णांसाठी आठवड्यातून बुधवार, शुक्रवार, रविवार या तीन दिवस मांसाहार जेवण द्यावे तसेच रोज नाश्त्यासोबत उकडलेले अंडे रोज देण्यात यावे, असे आदेश दिले.
योग्य जेवण न देणाऱ्या मक्तेदारांवर होणार कारवाई
क्वारंटाईन सेंटरचे मक्तेदार जेवण व्यवस्थितपणे देत नाहीत किंवा कमी प्रमाणात देतात, असे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खराटे यांनी दिली. त्यानंतर सोलापूर शहरातील वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता शहरातील विविध कोविड केअर सेंटर व क्वारंटाईन सेंटर येथे भेट देऊन त्या ठिकाणाची व्यवस्थेची पाहणी केली. तसेच ज्या ठिकाणी डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे अशा ठिकाणी डॉक्टरांची व कर्मचारी यांची नेमणूक त्वरित करण्यात येईल, असेही अतिरिक्त आयुक्त म्हणाले.
रुग्णांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या
अतिरिक्त आयुक्त यांनी सिंहगड कोविड केअर सेंटर येथील रुग्णांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी रुग्णांची विचारपूस केली तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाबद्दल व इतर सुविधांबद्दल माहिती घेतली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांनी या ठिकाणी व्यवस्थित रित्या देखभाल होत आहे. तसेच जेवण देण्यात येणारा अन्न काही दिवसापूर्वी चांगल्या प्रतीचे नव्हते. पण, गेल्या दोन दिवसापासून आम्हाला देण्यात येणारे जेवण हे व्यवस्थितपणे असून यापुढेही असेचे जेवण देण्यात यावे, अशी अपेक्षा त्याठिकाणी उपस्थिती असलेल्या रुग्णांनी व्यक्त केली. यावेळी सहनियंत्रण अधिकारी सहायक आयुक्त विक्रम पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा -'आम्हाला कोणाचीही विकेट घेण्याची गरज नाही'
हेही वाचा -'सोलापुरातील खासगी रुग्णालय लुटमारीचा धंदा करत असेल तर सोडणार नाही'