महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टेंभुर्णी येथील तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित, पोलीस अधीक्षक सातपुते यांची कारवाई - तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळळ्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती

टेंभुर्णी येथील तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित
टेंभुर्णी येथील तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

By

Published : May 9, 2021, 1:54 PM IST

पंढरपूर - माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकांना अडवून चारचाकी वाहन धारकांना नाहक त्रास देणाऱ्या तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला कॉन्स्टेबलसह तीन जणांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशीनंतर कारवाईचा हा बडगा उगारला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल रमेश कुरनार, प्रवीण शिंपाळे व प्रियांका आखाडे, अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

चार चाकी धारकांना अडवून पैशासाठी नाहक त्रास..

सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. त्याचप्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळळ्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. हे तिघेजण टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकांना अडवून तसेच चारचाकी वाहनधारकांना अडवून पैशासाठी नाहक त्रास देत असल्याच्याही काही तक्रारी होत्या.

पोलीस खाते अंतर्गत चौकशी होणार

माढा तालुक्यातील काही व्यापाऱ्यांनी याबाबत विभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हिरे यांनी तिघांविरुद्ध वाढत चाललेला तक्रारींचा पाढा तेजस्वी सातपुते यांच्या समोर वाचला. पडताळणीत तक्रारींबाबत तथ्यता आढळून आली. त्यामुळे त्या तिघांना तत्काळ निलंबित केले. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details