पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणार्या तीन बोटी जेसीबीच्या साह्याने महसूल व पोलिस प्रशासनाकडून नष्ट करण्यात आल्या आहेत. ही कारवाई महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. याबाबतची माहिती पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली आहे. यामुळे अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्यांना दणका बसला आहे.
भीमा नदी पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या तीन बोटी नष्ट, महसूल व पोलीस प्रशासनाच कारवाई - भीमा नदी पात्रातून वाळूची तस्करी
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणार्या तीन बोटी जेसीबीच्या साह्याने महसूल व पोलिस प्रशासनाकडून नष्ट करण्यात आल्या आहेत. ही कारवाई महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.
भीमा नदी पात्रातील तीन बोटी केल्या नष्ट -
तहसीलदार बेल्हेकर यांना पंढरपूर तालुक्यातील अहिल्या चौकातील भीमा नदी पात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. महसूल व पोलिस पथक भीमा नदी पात्रात कारवाईसाठी गेले असता त्या ठिकाणी तीन बोटीतून अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याचे दिसून आले. त्याचवेळी पथकाला पाहताच वाळूचा उपसा करणारे पळून गेले. त्यानंतर सदर पोलीस पथकाने जेसीबीच्या साह्याने तीन बोटी नष्ट केल्या व त्यामधील दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या तीन बोटी महसूल व पोलीस पथकाने नष्ट केल्या. सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या बोटी प्रशासनाकडून नष्ट करण्यात आल्या. बोटीमधील दोन ब्रास वाळू महसूल विभागाकडून जप्त करण्यात आली आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.