महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकलूज येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, पोलिसांकडून तिघा जणांना अटक

एक ग्राहक इंजेक्शनची मागणी करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवला,  त्यानंतर या आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही ते बेकायदेशीरीत्या रेमडेसिवीर इंजेक्शन किमतीपेक्षा जास्त म्हणजे 35 हजार रुपयांना एक असे विक्री करताना आढळून आले.

अकलूज येथे रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार
अकलूज येथे रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार

By

Published : May 6, 2021, 2:04 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलिसांनी रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर आरोपींना न्यायालयाने आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून तीन जणांना अटक

अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुरेगावकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तीन जणांना रंगेहात पकडले आहे. आण्णासाहेब सुग्रीव किर्दकर (वय २८ वर्षे रा चाकाटी लाखेवाडी ता. इंदापूर जि. पुणे) अजय महादेव जाधव (वय २३ वर्षे), कुमार महादेव जाधव (वय २१ वर्षे दोघे रा. संग्रामनगर ता. माळशिरस) यांनी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी तक्रार दिली.

तिन्ही आरोपींना सात मेपर्यंत पोलीस कोठडी -

या तिन्हीआरोपींकडे रेमडेसिवीर इंजेक्शन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एक ग्राहक इंजेक्शनची मागणी करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवला, त्यानंतर या आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही ते बेकायदेशीरीत्या रेमडेसिवीर इंजेक्शन किमतीपेक्षा जास्त म्हणजे 35 हजार रुपयांना एक असे विक्री करताना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना अटक केली. न्यायालयापुढे हजर केले असता, त्या तिघांनाही 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details