पंढरपूर - गतवर्षी गळीत हंगामासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे अर्ज सादर केले होते. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यांचे प्रस्ताव मुदतीत दिले नाहीत. त्यामुळे यंदा अदिनाथ, गोकुळ, लोकमंगल, जयहिंद, फॅबटेक साखर कारखाने बंदच राहणार आहेत.
यंदा अदिनाथ, गोकूळ, लोकमंगल, जयहिंद, फॅबटेक साखर कारखाने राहणार बंदच - गोकूळ साखर कारखाना बंद
यावर्षी अदिनाथ, गोकूळ, लोकमंगल, जयहिंद, फॅबटेक साखर कारखाने बंदच राहणार आहेत.
गोकुळ शुगर - धोत्री
लोकमंगल - भंडारकवठे
लोकमंगल - बीबीदारफळ
जयहिंद शुगर -आचेगाव
फॅबटेक - नंदूर
आदिनाथ - करमाळा
मातोश्री लक्ष्मी शुगर - रुद्देवाडी
सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडे ३० सप्टेंबरअखेर यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास इच्छुक असलेल्या साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी विहित नमुन्यात आनलाइन अर्ज सादर करणे अपेक्षित होते, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली.
ऊस उत्पादक शेतकऱयांच्या ऊस बिलाची रक्कम काही कारखान्यांनी आतापर्यंत अदा केली नाही. तरीही त्यांना गाळप परवाना मागणीचा अर्ज करता येतो. मात्र, कारखान्याने गतवर्षीच्या हंगामातील संपूर्ण देणी देऊन बेबाकी दाखले सादर केल्याशिवाय त्यांना परवाना मिळणार नाही. यातील काही कारखान्यांचा अपवाद वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली असली तरी परवाना मागणी न करण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे.