सोलापूर : येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून लगातार तिसऱ्या दिवशीही चोरीची घटना सोलापूर पोलीस आयुक्त हद्दीत घडली आहे. या चोरीत चोरट्याने 1 लाख 47 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे चोरी झालेल्या घरातील सदस्य क्वारंटाईनमध्ये आहेत. क्वारंटाईन झालेल्या रुग्णांची घरे असुरक्षित आहेत. सोलापूरमध्ये क्वारंटाईन झालेल्यांची घरी चोरीची दुसरी घटना समोर आली आहे.
सोलापुरात क्वारंटाईन झालेल्या रुग्णांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आशा वर्करच्या घरच्यांना क्वारंटाईन केले होते. त्या घरातदेखील दोनच दिवसांपूर्वी चोरोट्याने डल्ला मारत पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. आता सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एका घरफोडीची नोंद झाली आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आशा वर्करच्या घरच्यांना क्वारंटाईन केले होते. त्या घरात दोनच दिवसांपूर्वी चोरोट्याने डल्ला मारत पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. तर, आता सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एका घरफोडीची नोंद झाली आहे. किरण राम व्हनकोरे(वय 25 रा. कोणापुरे चाळ रेल्वे लाईन सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची बहिण भूषण नगर येथे भाड्याने राहावयास आहे. चार दिवसांपूर्वी घर मालकासह भाडेकरुंना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची बहिण 29 जूनरोजी रात्री 10 वाजता घराला कुलुप लावून क्वारंटाईन झाली होती. तसेच घर मालकाच्या खोलीलादेखील कुलुप लावण्यात आले होते. 29 जून रात्री 10 ते 30 जून पहाटे 6 वाजेपर्यंत कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरामधील सोन्याचे लॉकेट, झुबे, नथ, पैंजण, गॅस टाकी, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 47 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि भुसनूर करत आहेत.
लॉकडाऊननंतर हाताला काम नसल्याने चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी कोरोनाबाधित झालेल्या आशा वर्करच्या घरी पावणे दोन लाखांची चोरी झाली होती. तर, बाळे येथे एका तरुणास लुटमार करत 40 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला होता. लॉकडाऊनच्या बंदोबस्तामधून थकलेल्या पोलिसांनी आलेली मरगळ झटकून या चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.