महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 5, 2020, 5:36 PM IST

ETV Bharat / state

सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण नाही, अश्विनी रुग्णालयाचा खुलासा

सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये 4 मार्च 2020 रोजी 1 रूग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. सदर रुग्ण न्यूमोनियाचा होता. रूग्णालयाने सदर रुग्णाची तपासणी केली असता, रुग्ण न्यूमोनियाने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

Solapur
अश्विनी रुग्णालय

सोलापूर- शहरातील एका आर्किटेक्टला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मात्र, सोलापुरातल्या अश्विनी रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली नसल्याचा खुलासा केला आहे. हा रुग्ण न्यूमोनिया आजाराने ग्रस्त असल्याचे रुग्णालयाने जाहीर केले आहे.

सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण नाही

हेही वाचा -संतापजनक..! पित्याकडूनच चिमुकलीवर दुष्कर्म

सोलापुरातील अश्विनी सहकारी रूग्णालयामध्ये 4 मार्च 2020 रोजी 1 रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. सदर रुग्ण न्यूमोनियाचा होता. रुग्णालयाने सदर रुग्णाची तपासणी केली असता, रुग्ण न्यूमोनिया आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

रुग्णांच्या विनंतीवरून रुग्णास पुणे येथे नेण्यात आले आहे. अश्विनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी रुग्णालयामध्ये नोविल कोरोनाग्रस्त बाधित अथवा संशयित रुग्ण दाखल नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा -हेल्मेटसक्तीसाठी सोलापूर आरटीओ कार्यालयाकडून आता नवीन फंडा!

ABOUT THE AUTHOR

...view details