महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्हा सध्यातरी कोरोनामुक्त, 'त्या' 46 जणांचे अहवाल निगेटिव्ह, - कोरोना विषाणू

दक्षिण सोलापुरातील वांगी परिसरातून काम करणारा मजूर ग्वाल्हेर येथे गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर या परिसरातील सर्व गावांची शुक्रवारी आणि आज पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. जवळपास 3 हजार 60 लोकांची तपासणी झाली. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

Solapur
मिलिंद शंभरकर

By

Published : Apr 11, 2020, 10:59 AM IST

सोलापूर- जिल्ह्यातून मध्यप्रदेशात गेलेल्या मजूराला कोरोनाची लागण झाली आहे. ग्वाल्हेर येथे सापडलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 46 जणांचे कोरोना अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नसल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापूरमध्ये आत्तापर्यंत 212 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. दक्षिण सोलापुरातील वांगी परिसरातून काम करणारा मजूर ग्वाल्हेर येथे गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर या परिसरातील सर्व गावांची शुक्रवारी आणि आज पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. जवळपास 3 हजार 60 लोकांची तपासणी झाली. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शुक्रवारी जवळपास 56 जणांची या भागात कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 46 जणांचे अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

दिल्लीतील मरकझ येथील कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या आणि त्यांच्याशी संबंधित 53 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे अहवाल पूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. यातील 22 जणांची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली होती. त्यांचेही अहवालही निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हा पोलिसांनी ग्रामीण भागात लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी जोरदार कारवाई केली असून आतापर्यंत साडेतीन हजार पेक्षा अधिक दुचाकी वाहन जप्त केली आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. जी वाहने जप्त केली आहेत, त्याबाबत लॉकडाऊन उठल्यानंतर न्यायालय आणि शासनाच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली आहे.

सोलापूर शहर पोलिसांनी शहरातील विविध भागातील गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू सेवांचा लाभ घेताना आणखी काटेकोर नियमावली केली आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजीपाला विक्री, 2 वाजेपर्यंत घरपोच भाजी सेवा देता येईल. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत तसेच दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दूध विक्री करता येईल. किराणा दुकान व बेकरी माल यांना सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेतच विक्री करता येईल. त्यानंतर घरपोच सेवा देण्यास मुभा असेल. बँक सेवा सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच सुरु ठेवता येईल. कीटकनाशक बी-बियाणे खते यांची दुकानं सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेतच सुरू राहतील, असे सोलापूरचे पोलीस आयूक्त अंकूश शिंदे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details