महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, मरकझवरून आलेले 47 जण निगेटीव्ह - no Corona patient in Solapur news

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहीजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. यात सहभागी झालेल्यांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू झाली . सोलापूर आत्तापर्यंत 47 जणांची यादी या यासंबंधी मिळाली या सर्वांची तपासणी झाली असून अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

There is no Corona patient in Solapur, 47 people from Markaz are negative
सोलापूरात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, मरकझवरून आलेले 47 जण निगेटीव्ह

By

Published : Apr 6, 2020, 10:27 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात 6 एप्रिलपर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. दिल्ली येथील मरकझच्या कार्यक्रमासाठी गेलेले सर्व 47 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. तसेच आत्तापर्यंत संशयीत म्हणून तपासणी केलेले 127 जणांचे अहवालही निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहीजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. यात सहभागी झालेल्यांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू झाली . सोलापूर आत्तापर्यंत 47 जणांची यादी या यासंबंधी मिळाली या सर्वांची तपासणी झाली असून अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अजूनही काही लोकांची तपासणी बाकी असेल तर त्यांनी तातडीने स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर जप्ती करण्याची कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली वाहन लगेच सोडण्यात येणार नाहीत. लॉकडाऊन उठल्यानंतर याविषयी कार्यवाही होईल, असेही यावेळी सुचित करण्यात आले आहे. यापुढे मॉर्निंग वॉक, गरज नसताना शहरात फिरणे, गल्लीबोळात गर्दी करुन गप्पा मारत बसणे, गर्दी जमवणे अशी कृत्ये निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे. ज्या वाहनांना परवानगी पास नाही या वाहनांना ताब्यात घेण्यात येईल, तसेच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details