सोलापूर -जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सोलापूरात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 216 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून २९ जण बरे झाले आहेत.
सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या 216वर; 14 जणांचा मृत्यू तर 29 जण कोरोनामुक्त - सोलापूर कोरोना मृत्यू
सोलापूरमध्ये शनिवारी एका दिवसात 175 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यातील 155 अहवाल निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह आले. नव्या कोरोनाबाधितांमध्ये 12 पुरूष आणि 8 महिलांचा समावेश आहे. एका 48 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला 7 मे ला सकाळी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
![सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या 216वर; 14 जणांचा मृत्यू तर 29 जण कोरोनामुक्त Corona positive](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7134931-411-7134931-1589076309677.jpg)
शनिवारी एका दिवसात 175 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यातील 155 अहवाल निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह आले. नव्या कोरोनाबाधितांमध्ये 12 पुरूष आणि 8 महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत सोलापूरात 2 हजार 993 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यापैकी 2 हजार 840 अहवाल प्राप्त झाले असून 2 हजार 624 अहवाल निगेटिव्ह तर 216 पॉझिटिव्ह आहेत. अद्याप 153 जणांचे अहवाल येणे आहेत.
शनिवारी आढळलेल्या 20 रुग्णांमध्ये शास्त्रीनगर 6, कुमठा नाका 2, एकता नगर 2, नीलमनगर 2, बापूजीनगर, केशवनगर, मनोरमानगर, सदर बझार लष्कर, कुंभार गल्ली लष्कर, साईबाबा चौक, नईजिंदगी, अशोक चौक येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहेत. एका 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला 7 मे ला सकाळी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.