सोलापूर - जवळपास ४०० वर्षानंतर गुरू आणि शनी या दोन ग्रहांची युती काल सोमवारी सोलापुरकरांना अनुभवता आली. सोलापुरातील सायन्स सेंटरमध्ये नागरिकांसाठी ही खगोलीय घटना अनुभवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
४०० वर्षांपूर्वी शनी आणि गुरू हे ग्रह इतक्या जवळ आले असले, तरी डोळ्यांना सहज दिसू शकत नव्हते. तब्बल ८०० वर्षानंतर शनी आणि गुरूची ही 'युती' इतक्या सहजरित्या लोकांना अनुभवता आली. अशी माहिती विज्ञान केंद्राचे संग्रहालय अभिरक्षक राहुल दास यांनी दिली. शालेय अभ्यासक्रमात ग्रहांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अगदी उत्सकूतेने या घटनेचा अनुभव घेतला.
गुरू -
हा मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियमने बनलेला महाकाय ग्रह आहे. जो पृथ्वीपेक्षा ११ पटीने मोठा आहे. सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू या ग्रहाला ओळखले जाते. याचे परिक्रमण काळ हे १२ वर्ष आहे.