सोलापूर -शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. बुधवारी सोलापुरात एकूण 1322 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने सुरूच आहे. बुधवारी शहर आणि जिल्ह्यातील एकूण 44 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लागण झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सोलापुरात बुधवारी 1404 रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनावर मात करणारांची संख्या अधिक -
शहरात बुधवारी मनपा आरोग्य प्रशासनाने 1840 जणांची तपासणी केली होती. त्यामध्ये फक्त 78 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये 47 पुरुष आणि 31 स्त्रियांचा समावेश आहे. तर शहरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 9 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 5 स्त्रिया आहेत. शहरातील 128 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शहरात विविध रुग्णालयात 1317 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात लागण झालेल्यांची संख्या आणि आणि बरे होणाऱ्यांची संख्या पाहता कोरोना महामारीची लाट ओसरताना दिसत आहे. महामारीच्या लाटेची तीव्रता जरी कमी झाली असली तरी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र सुरूच आहे. सर्व व्यवहार आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचे थैमान -