पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीचे बाळ रस्त्यावर सोडून अज्ञात निघून गेले ( New Born Baby Thrown On Street ) होते. मात्र रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचा जीव वाचवला. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने या बाळाला जन्म दिला होता. सदर मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली ( Rape of a minor girl left her pregnant ) आहे.
नुकतेच जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर टाकून गेले पळून, मुलीवर अत्याचार करणारे दोघे अटकेत - अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने राहिली गर्भवती
तिघा आरोपींनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती ( Rape of a minor girl left her pregnant ) केले. त्यातून जन्मलेल्या अर्भकाला रस्त्यावर टाकून त्यांनी पळ ( New Born Baby Thrown On Street ) काढला. पोलिसांनी घटनेचा तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली येथे ही घटना घडली.
![नुकतेच जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर टाकून गेले पळून, मुलीवर अत्याचार करणारे दोघे अटकेत पंढरपूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14816600-819-14816600-1648054238458.jpg)
पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली येथे देवदर्शनासाठी निघालेल्या अविनाश वसेकर (वय 32) हे आपल्या कुटुंबासह शनिवारी रात्री निघाले होते. मात्र त्यांना रस्त्यातच नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे बाळ आढळून आले. मात्र सदर बाळाजवळ कोणी नसल्यामुळे सदर बाळाला पंढरपूर येथील डॉ. शितल शहा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्या बाळाचे प्राणही वाचली. या प्रकरणाची पंढरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.
पंढरपूर तालुका पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता सदर मुलीची डिलिव्हरी झाली. ती मुलगी अल्पवयीन असल्याचे पुढे आले. या प्रकरणी माहिती लपल्यामुळे आई-वडील यांच्यासह एका रिक्षा वाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीकडे अधिक चौकशी केली असता. तिच्यावर तिघांनी अत्याचार केल्याचे समोर आले. किरण दावणे व दत्ता खरे असे दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे. पुरुष जातीच्या बाळाचे वडील कोण? याची तपासणी करण्यासाठी दोघांचेही डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.