महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, पणनमंत्र्यांचे बाजार समितीला आदेश

शेतमालाला हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समित्यांनी गुन्‍हे दाखल करावेत, अशा सूचना राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यातील बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबवावी, अशाही सूचना देशमुख यांनी यावेळी दिल्या आहेत.

By

Published : Feb 23, 2019, 9:44 PM IST

bajar

सोलापूर - शेतमालाला हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समित्यांनी गुन्‍हे दाखल करावेत, अशा सूचना राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यातील बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबवावी, अशाही सूचना देशमुख यांनी यावेळी दिल्या आहेत. ते सोलापुरातील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.

bajar

कृषी पणन मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजना व इनाम योजनेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या राज्यातील बाजार समिती समितीला महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतातील माल उत्पादित झाल्यानंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बाजारात येतो आणि त्यामुळे शेतमालाचे दर कोसळतात या कोसळणाऱ्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी पणन मंडळाकडून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली नसल्याचे सांगत गेल्या ४ वर्षात मोठ्या प्रमाणावर शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज दिले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

यापुढील काळातही राज्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना शेतीमाल तारण कर्ज योजनेतून जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच राज्य सरकारने जाहीर केलेला हमीभाव पेक्षा कमी दराने एखादा व्यापारी शेतीमाल खरेदी करत असेल तर अशा व्यापाऱ्यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी सूचना दिल्या असल्याचे सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी चालू हंगामापासून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत राज्यांमध्ये शेतमाल तारण कर्ज योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या बाजार समित्यांना सहकार मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे बाजार समितीला वर्ग बाजार समित्यांमधील प्रथम पुरस्कार देण्यात आला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला द्वितीय तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेतमाल तारण योजनेमध्ये वर्ग बाजार समित्यांमध्ये प्रथम पुरस्कार हा मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला तर द्वितीय पुरस्कार गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रदान करण्यात आला तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळविला.

ABOUT THE AUTHOR

...view details