पंढरपूर -सोलापूर जिल्ह्यातीलसांगोला तालुक्यातील माडग्याळ जातीचा सर्जा मेंढ्याचा 29 एप्रिल रोजी उपचार चालू असताना मृत्यू झाला. त्याला बाजारामध्ये 71 लाख रुपयांपर्यंत बोली लागली होती. सांगोला तालुक्यातील चांडोलीवाडी या गावातील मेंढपाळ बाबूराव मिटकरी यांचा सर्जा नावाचा मेंढा होता. बाबूराव मिटकरी यांनी त्याचे नाव सर्जा ठेवले होते. सर्जा मेंढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नाक पोपटासारखे मोठे होते. त्यामुळे तो लक्षवेधी ठरत होता.
सर्जाची 71 लाखाला मागणी
महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिकी पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने एकत्र जमत असतात. या मोठ्या उत्सवात हौशी मेंढपाळ, पशुपालक जनावरांसह हजर राहत असतात. याच बाजारामध्ये बाबूराव मिटकरी यांच्या सर्जालाही प्रसिद्धीसाठी दाखल केला होता. त्यावेळी त्याला 71 लाख रुपये इतकी बोली लागली होती.
सर्जाकडून वर्षाला मिळायचे 50 लाखांचे उत्पन्न