सोलापूर(माढा) - परांडा तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय फळ विक्रेत्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने नवी मुंबई मार्केटमध्ये जात असताना माढ्यातून देखील खरबूज खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे माढा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
परांड्यातील 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह फळ विक्रेत्याने केली होती माढ्यातील शेतकऱ्यांकडून फळ खरेदी - परांडा कोरोनाबाधित रूग्ण
परांडा तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय फळ विक्रेत्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. सहा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह फळ विक्रेत्याने नवी मुंबईच्या मार्केटला जाताना माढ्यातुन खरबूज खरेदी केले होते. या रुग्णाकडे केलेल्या चौकशीमध्ये ही बाब समोर आली.

सहा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह फळ विक्रेत्याने नवी मुंबईच्या मार्केटला जाताना माढ्यातुन खरबूज खरेदी केले होते. या रुग्णाकडे केलेल्या चौकशीमध्ये ही बाब समोर आली. नवी मुंबई(वाशी)येथे माल विक्री करुन गावाकडे परत आला असता ताप, खोकला, सर्दीचा त्रास या व्यक्तीला सुरू झाला. त्याला कोरोना संशयित म्हणून परांडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
दरम्यान, माढा परिसरातील गावातून त्या फळ विक्रेत्यांने खरबूज खरेदी केली. त्यावेळी त्याच्या संपर्कात आलेल्या शेतकऱयांचा शोध घेतला जात आहे. या फळ विक्रेत्याशी संबध आला असल्यास नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.