सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले गुरूजी हे झळकले ते अमेरिकन फुलब्राइट संस्थेने त्यांना शिष्यवृत्यी जाहीर केली तेव्हा. डिसले गुरूजी यांनी क्यूआर कोड प्रणाली विकसित केली आहे. त्यानंतर त्यांना पुरस्कार मिळाला. या काळात डिसले गुरूजींचे राज्यभरात भांबावल्याप्रमाणे कौतूक झाले. ( Take Action Against Disley ) मात्र, त्यांच्या शाळेतील कार्यकाळाबद्दल कायम वादंग राहीले आहे. हेच वादंग आता उफाळून आले असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डीसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता डिसले यांनी पगार घेतला अशी तक्रार जिल्हा प्रशासनाची आहे.
सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार - येत्या (8 ऑगस्ट)रोजी त्यांना कार्यमुक्त केले जाणार असले तरी जिल्हा प्रशासन डीसले गुरुजींवर कारवाई करणार आहे. ( Administration Will Take Action Against Disley Guruj ) जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला आहे असी तक्रार जिल्हा प्रशासनाची आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या काळातील सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे, अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे.
चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे सादर - सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी (2017 ते 2020)या कालावधीत काय केले? याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनियरित्या सादर करण्यात आला आहे.
रजेच अर्ज गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्या - डिसले यांना पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतील फुल ब्राईट संस्थेने शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये ते अमेरिकेला जाणार होते. त्यासाठी परवानगी मागण्यासाठी जानेवारी महिन्यात ते जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी शिक्षणाधिकारी लोहार यांनी रजा मंजुरीची नियमावली सांगितली होती. रजेचा अर्ज गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे द्या. तेथून तो माझ्याकडे येईल, असही त्यांनी सांगितले होते.