महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवेढा कारागृहातून आरोपीचे पलायन; गुन्हा दाखल - mangalvedha news

आरोपी दत्तात्रय मोटे (रा.तनाळी) याला मोटरसायकल चोरी प्रकरणात मंगळवेढा पोलिसांनी २९ सप्टेंबरला अटक केली होती. तो सध्या मंगळवेढा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कारागृहातील सर्व आरोपींना टप्याटप्याने शौचालयास व स्नानासाठी सबजेलमध्ये शौचालय नसल्याने जेलबाहेर काढले होते. त्यानंतर तो पळून गेला होता.

मंगळवेढा

By

Published : Oct 7, 2019, 1:56 PM IST

सोलापूर - मंगळवेढा येथील सबजेल कारागृहातून चार पोलिसांची भर दिवसा नजर चुकवून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केले आहे. दत्तात्रय मनगेनी मोटे (वय ३० ,रा .तनाळी ता.पंढरपूर) याने झाडाच्या फांदीचा आधार घेऊन भिंतीवरून उडी मारून रविवारी सकाळी पलायन केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

या घटनेची माहिती अशी की, यातील आरोपी दत्तात्रय मोटे (रा .तनाळी) याला मोटरसायकल चोरी प्रकरणात मंगळवेढा पोलिसांनी २९ सप्टेंबरला अटक केली होती. तो सध्या मंगळवेढा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कारागृहातील सर्व आरोपींना टप्याटप्याने शौचालयास व स्नानासाठी सबजेलमध्ये शौचालय नसल्याने जेलबाहेर काढले होते.

यावेळी गार्डवर असलेल्या चार पोलिसांची नजर चुकवून त्याने एका झाडाच्या फांदीचा आधार घेऊन जेलच्या स्लॅबवर चढला व भिंतीवरून सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडील इमारतीच्या बाजूस उडी मारून अर्धनग्न अवस्थेत पळून गेला. आरोपी पळाल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच गार्डवर असलेल्या पोलिसांची पळताभुई थोडी झाली. या घटनेची माहिती डीवायएसपी दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांना देताच ते घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा - थरारक! गुजरातमध्ये कोसळला साठ फूट लांब पूल, पहा व्हिडिओ..

शहराच्या कडेला असलेल्या एका ऊसाच्या फडात या आरोपीने आश्रय घेतल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांची जादा कुमक मागवून संपूर्ण ऊसाच्या फडाला गराडा घातला. एका पोलीस कर्मचाऱ्याने झाडावर चढून ऊसाच्या फडाची टेहाळणी केल्यानंतर आरोपी ऊसाच्या आत दडून बसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल अतुल खराडे यांनी आरोपी दत्तात्रय मोटे याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details