महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळेच तिवरे धरण फुटले; जलसंपदा मंत्र्यानंतर आता जलसंधारण मंत्र्याचा जावईशोध - सोलापूर

पुण्यातील मुठा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटल्याचे अजब तर्कट मांडले होते. त्यानंतर आता तिवरे धरण प्रकरणी जलसंधारण मंत्र्यांनी हा जावईशोध लावला आहे.

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत

By

Published : Jul 4, 2019, 8:27 PM IST

सोलापूर- शिवसेनेशी निगडीत ठेकेदार तिवरे धरणफुटीला कारणीभूत नाही. धरण परिसरात असलेल्या खेकड्यांचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे धरण फुटल्याचा जावईशोध राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी लावला आहे.

सोलापूर येथे बोलताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत

युवासेना नेते आदित्या ठाकरे जलसंपदाव विभागाच्या आष्टी उपसासिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे अजब वक्तव्य केले.

रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे धरण फुटले. त्याला जबाबदार कोण? असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे. तसेच शिवसेनेच्या आमदाराने हे धरण बांधले आहे. याप्रकरणी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निकृष्ट बांधकामाची चौकशी करून कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महाजनांचा रोख शिवसेनेकडे होता काय? असा प्रश्न सावंत यांना विचारला होता. त्यावर त्यांनी हे अजब उत्तर दिले.

गेल्या वर्षी २८ सप्टेंबरला पुण्यातील मुठा कालवा फुटला. त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटला, असे अजब वक्तव्य केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details