सोलापूर- सात बारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी 3 हजाराची लाच तलाठ्याने मागितली होती. अस्लम शेख असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
लाच घेणारा तलाठी अटकेत, सात बारा नोंदीसाठी मागितली होती लाच - bribe
खरेदी केलेल्या जमीनीची नोंद करण्यासाठी 3 हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
बार्शी तालुक्यातील दहिटणे या गावात खरेदी केलेल्या 11 गुंठे जमिनीचा सात बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी दहिटणे येथील तलाठी अस्लम शेख यांनी 3 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर बुधवारी वैराग या ठिकाणी सापळा रचून 3 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या तलाठ्याविरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली.