महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur Accident : स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 6 जण ठार

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. सर्व मृत कर्नाटकातील रहिवासी आहेत.

Solapur Accident
सोलापूर अपघात

By

Published : Jun 30, 2023, 7:34 PM IST

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील शीरवळवाडी वळणावर क्रूझर गाडी व सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

सर्व भाविक कर्नाटकातील : अपघातात जखमी व मृत्युमुखी पडलेले सर्व भाविक हे कर्नाटकातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील अणूर गावचे रहिवासी होते. अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अंजुम सय्यद, डॉ. घंटे या डॉक्टरांची टीम जखमींवर तातडीने उपचार करत आहेत

स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतताना झाला अपघात : हे सर्व भाविक शुक्रवारी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. भाविकांच्या क्रूझर गाडीची व सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात क्रूझर मधील महिला व लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच ते सहा जण जखमी झाले. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पंचनामा करत आहेत.

जखमींचे नावे : सुमित पूजारी, रेखा गोविंद पूजारी (40), गोपाळ पुजारी (45), विठ्ठल ननावरे (38 वर्ष), अजित कुंदले (30), नागेश कुंदले, कल्पना कुंदले (40), अशोक कुंदले (45), कोमल शामंडे (50) व सुनील पांचाळ (50) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. 3 killed On Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर आयशरला क्रूझर धडकून भीषण अपघात; पती पत्नीसह दीड वर्षाची चिमुकली ठार
  2. Satara Accident : पाचगणीहून परतताना मोटरसायकल अपघातात दोन मित्र जागीच ठार; तिसरा मित्र 'असा' बचावला
  3. Amravati Accident News : दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार

ABOUT THE AUTHOR

...view details