महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दामाजी साखर कारखान्याचे एफआरीपीबाबत लेखी आश्वासन; स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित

सोलापूर जिल्ह्यातील दामाजी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे बिले अदा न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आदोलन करण्यात येत होते. त्यावेळी त्यांच्या हल्ला करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात मध्यस्ती केली. तसेच साखल आयुक्तालयाकडून कारवाईचे आदेश आल्यानंतर कारखान्याने स्वाभिमानी संघटनेच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

sugar caneोेि
दामाजी साखर कारखाना आंदोलन

By

Published : Dec 24, 2020, 9:23 AM IST

Updated : Dec 24, 2020, 10:00 AM IST


पंढरपूर(सोलापूर) -श्री संत दामाजी सहकारी कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम आणि मागील हंगामातील बिलातील ७४ रुपयांची थकबाकी दिलेली नाही. या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना स्थळावर आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र, २० डिसेंबरला या आंदोलकांना दोन अज्ञातांनी तलवारीचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दामाजी साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकून तब्बल चार तास कारखाना बंद पाडला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेल्यानंतर कारखान्याने लेखी आश्‍वासन दिल्याने स्वाभिमानीने आंदोलन स्थगित केले आहे.

कारखान्यातील अधिकाऱ्यांची चर्चेनंतर तोडगा

आंदोलकांनी कारखान्याच्या गव्हाणीत उडी मारून कारखाना बंद पाडल्याचा प्रकार घडल्यानंतर कारखान्याच्या संंबधित पदाधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेतली. मात्र,त्यात निर्णय न झाल्याने हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात गेेले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत साखर संचालकांना या कारखान्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी साखर संचालकांनी कारवाईचे पत्र दामाजी कारखाना प्रशासनाला दिल्यानंतर कारखाना प्रशासनाने तत्काळ बैठक बोलावून एफआरीप आणि थकबाकी देण्याचे लेखी आश्वासन दिले.

दामाजी साखर कारखान्याचे एफआरीपीबाबत लेखी आश्वासन;
आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न-जिल्ह्यात साखर कारखाने एफआरपीप्रमाणे उसाचा दर अदा न केल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर संघटनांनी जिल्ह्यातील अनेक कारखान्यांसमोर आंदोलने केल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी साखर कारखानदारांची बैठक घेऊन ऊस उत्पादकांना एफआरपीचा निर्णय 15 डिसेंबरपूर्वी घ्यावा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यामध्ये विविध कारखान्यांसमोर आंदोलन सुरू करण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांचा साखर सहसंचालक प्रस्ताव

दोन दिवसांपूर्वी कार्यकारी संचालकांनी कारखान्याची आर्थिक परिस्थिती, साखरेचे दर, साखर उतारा पाहता एफआरपीची रक्कम व उर्वरित बिल लवकर देण्याबाबत ठेवलेला प्रस्ताव संघटनेने अमान्य केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केल्यावर त्याबाबतचा अहवाल साखर सहसंचालकांकडे पाठवण्यात आला आहे.

Last Updated : Dec 24, 2020, 10:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details