पंढरपूर- ''राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाले आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे" अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी शनिवारी पंढरपुरात केली होती. राजू शेट्टी यांच्यावर खालच्या थरात टीका केली म्हणून माळशिरस येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खोत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून संघटनेकडून जाहीर निषेध केला.
सदाभाऊ खोत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, 'त्या' टीकेला स्वाभिमानीचे प्रत्युत्तर - Sadabhau khot news
दुधाच्या मुद्यावरून राज्यभरात भाजपाकडून आंदोलन सुरू आहे. एकीकडे भाजपाचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राजू शेट्टी आता मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली होती.

सदभाऊच भ्रमिष्ट झालेत
खोत यांच्या टीकेला शेट्टी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्यानं सदाभाऊ खोत भ्रमिष्ट झाल्याचा पलटवार शेट्टी यांनी केला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.