पंढरपूर-सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यातील एका कारखान्याने सतराशे रुपये ऊसदर जाहीर केल्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहे. सांगली, उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाला अडीच ते तीन हजार रुपये भाव जाहीर केला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी याप्रमाणे ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर, मोहोळ, माळशिरस या तालुक्यात ऊस ट्रॅक्टर वाहतूक थांबवून रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा व एफआरपीची रक्कम आधार करावी, यासाठी 5 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मात्र, शेतकरी संघटना व साखर कारखानदारांची ऊस दराबाबत कोणतीही बैठक न घेता, जिल्ह्यातील एका कारखान्यांने सतराशे रुपये ऊसदर जाहीर केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही भागात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून रस्त्यावरती टायर पेटवून ऊसदराचा जाहीर निषेध स्वाभिमानीच्यावतीने करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याची केली होती मागणी-