महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार माळशिरमध्ये रास्ता रोको - माळशिरसमध्ये रास्तारोको

ऊसदर प्रश्नी स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. जयसिंगपुरातील ऊस परिषदेत झालेल्या ठरावानुसार १४ टक्के वाढीव एफआरपीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. त्याच्या अनुषंगाने माळशिरसच्या संघटनेने प्रशासनास निवेदन सादर केले आहे.

swabhimani shetkari sangatna
स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार माळशिरमध्ये रास्ता रोको

By

Published : Nov 4, 2020, 4:54 PM IST

पंढरपूर - केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधातील कायदा मागे घ्यावा, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तोडणीपूर्वी ऊसदर जाहीर करावा. तसेच ज्या कारखान्याने मागील ऊस बिलाची एफ.आर.पी. दिली नाही, अशा संचालक मंडळावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे, अशा अनेक मागण्यांसह माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी मळोली येथे सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आणि वेळापूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार दिवटे यांच्याकडे आज याबाबतचे निवेदन देण्यात आले.

शेट्टींनी केले होते आवाहन-

ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, अशी मागणी कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी केली होती. एवढेच नव्हेतर एफआरपी थकवला तर साखर कारखाने बंद पाडणार असल्याचा इशारा दिला होता. तसेच येत्या 5 नोव्हेंबरला देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याचेही स्वाभिमानीने स्पष्ट केले होते. या साठी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी रस्ता रोखून धरणार आहोत. किमान दोन तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करावे, असेही आवाहन राजू शेट्टी केले आहे.

राजू शेट्टी यांच्या या आवाहानानुसार माळशिरस तालुक्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनास आंदोलनाची पूर्व सूचना देणारे निवेदन देण्यात आले. याेवळी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख, माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, सचिन पवार, आहिल पठाण, आप्पासाहेब माने देशमुख, प्रदीप ठवरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details