सोलापूर : शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाप्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात येत असून महाप्रबोधन रॅलीच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) या मतदारांशी संवाद साधत आहेत. आज रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांच्या मतदारसंघात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी भाजपचा आणि आमदार शहाजी बापू पाटील ( Sushma Andhare critics on MLA Shahaji Bapu Patil and BJP ) यांचा समाचार घेत सडकून टीका केली.
जाळ्यात अडकू शकत नाही : मी सर्वसामान्य कुटुंबातून आले असल्यामुळे माझ्यावरती आहे याचे आरोप लावता येत नाही, मी कोणत्या नेत्यावर टीका करत नाहीत त्यामुळे शब्दात त्यांना सापडत नाही, म्हणून तेरा वर्षांपूर्वीचा 40 सेकंदाचा व्हिडिओ काढून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जात आहे. या सभेमध्ये बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'मी सभेमधून जे प्रश्न विचारते आहे त्यावर बोलण्यापेक्षा, माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा भाजप मला अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु कायदा माझ्या बापाने लिहिला असल्यामुळे मी कधीच या जाळ्यात अडकू शकत नाही.
भाजप नेते गप्प का ?13 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पुढील मागील संदर्भ काढून हवे ते मजकूर सोशल मीडियावर भाजपद्वारे प्रसिद्ध केले जात आहे. परंतु या अगोदर रविशंकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले आक्षेपहार्य लिखाण, भिडे गुरुजींची बातमी, निवृत्ती महाराजांचे व इतरांचे प्रवचने तसेच पंतप्रधान मोदी व इतर भाजप नेत्यांनी केलेले विधाने याचे व्हिडिओच अंधारे यांनी भर सभे मध्ये दाखवले. यावर आशिष शेलार व भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत? असा सवाल अंधारे ( Sushma Andhare critics on BJP ) यांनी केला.
यासाठी महाप्रबोधन यात्रा :आज उद्योग गुजरातला, गाव कर्नाटकला तर नेते गुवाहटीला जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु आम्ही काय करायचं यासाठी आज महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करीत आहोत. भागवत संप्रदाय कधीही चमत्काराला थारा देत नाही. परंतु माझ्या विधानाचे चुकीचे अर्थ काढून माझ्यावर टीका केली जात आहे. राज्यपाल पदाबद्दल मला आदर आहे, परंतु व्यक्तींबद्दल त्यांनी केलेल्या महाराष्ट्राबद्दल, येथील नेत्यांबद्दल उद्गाराबद्दल मी त्यांचा निषेध व्यक्त करते. यावेळी तुषार इंगळे, जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर संभाजी शिंदे यांनी प्रस्ताविक केले.