महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sushma aandhare : चंद्रकांत पाटलांवर फडणवीसांनी आखला ठरवून ट्रॅप टाकण्याचा डाव; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट - Mahaprabodhan rally held at Sangola

सांगोला येथे आयोजित महाप्रबोधान रॅलीत सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकाकरत भाषण केले. ( Sushma andhare criticized on Devendra fadnavis ) अंधारे या राजकारणाबद्दल बोलू लागले, प्रश्न विचारू लागले, त्यावेळी त्यांना अडकाविण्याचा प्रयत्न केले जावू लागले आहेत. परंतु आपली पाटी कोरी असल्याने मी यांच्या जाळ्यात अडकू शकत नाही. कायद्यात राहून बोलले की फायद्यात राहते, कायदा लिहिणारा आमचा बापच असल्याने मी जाळ्यात अडकू शकत नसल्याचेही अंधारे यांनी सांगितले. (Mahaprabodhan rally held at Sangola)

Sushma aandhare
महप्रबोधान रॅलीत भाषण करताना सुषमा अंधारे

By

Published : Dec 26, 2022, 10:05 AM IST

महप्रबोधान रॅलीत भाषण करताना सुषमा अंधारे

सोलापूर ( सांगोला ) :चंद्रकांत पाटील यांना ठरवून ट्रॅप ( Chandrakant Patil decided to trap ) टाकण्याचा डाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी आखला असल्याचा, मोठा गौप्यस्फोट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare ) यांनी सांगोला येथे केला. सांगोला येथील महाप्रबोधन यात्रेनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Mahaprabodhan rally held at Sangola) झालेल्या सभेत सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी देवेंद्र फडणवीस कसे कपटनीतीचे राजकारण ( Fadnavis hypocritical politics ) करीत आहेत, याबद्दल सडेतोड बोलल्या. (Sushma andhare criticized on fadnavis )

भारतातील पक्ष संपवण्याचे काम :मी भूमिका मांडत राहिले, की शिवसेनेवर आगपाखड करणारे लोक किती बदमाश आहेत. किती खोटं बोलत आहेत. उद्धव साहेबांना त्रास देत आहेत आणि काय कपटनितीचे राजकारण करत आहेत. ही कपट निती टीम देवेंद्र यांनी कशी आखली आहे हे सांगितली आहे. भाजपने मागील 13 वर्षाचा 40 सेकंदाचा व्हिडिओ लावून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना ज्यांना जवळ केले त्यांना त्यांना पद्धतशीर पणे संपवले आहे. दक्षिण भारतातील, उत्तर भारतातील पक्ष संपवण्याचे काम केले आणि महाराष्ट्रमध्ये लोकनेत्या पंकजा मुंडे यांना बाजूला केले. नंतर विनोद तावडे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनाही बाजूला करण्याचा डाव आहे. तावडे त्यांच्या तावडीतून सुटून पुढे निघून गेल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

कायद्यात राहून बोलले की फायद्यात राहते : देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी सदाभाऊ खोत यांना शेट्टी पासून बाजूला करत भाजपच्या जवळ केले. त्यानंतर आता सदाभाऊ गोठ्यात धारा काढत बसले आहेत. आमचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिवेशनात 83 कोटींचा भूखंड दोन कोटींना कसा विकला हा घोटाळा भाजपनेच बाहेर काढला आहे. मी त्यांच्या या राजकारणाबद्दल बोलू लागले, प्रश्न विचारू लागले, त्यावेळी मला अडकाविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. परंतु आपली पाटी कोरी असल्याने मी यांच्या जाळ्यात अडकू शकत नाही. कायद्यात राहून बोलले की फायद्यात राहते, कायदा लिहिणारा आमचा बापच असल्याने मी जाळ्यात अडकू शकत नसल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details