प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर Sushilkumar Shinde : वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Jan Akrosh Morcha) आयोजित करण्यात आला होता. मोर्चानंतर कन्ना चौक येथे मोठी सभा देखील आयोजित करण्यात आली होती. मोर्चा मार्गस्थ होताना सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये हुल्लडबाजी करत दगडफेक करण्यात आली होती.
कायदा रद्द करणं संसदेच्या अधिकार क्षेत्रात: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे रविवारी सकाळी माध्यमांना माहिती देताना, दगडफेकीच्या घटनेवर खंत व्यक्त केला. सोलापुरात शनिवारी सायंकाळी जे घडलं ते निंदनीय आहे. सोलापुरातील शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'वक्फ बोर्ड कायदा' रद्दची मागणी करत मोर्चा आणि सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करणं संसदेच्या अधिकार क्षेत्रात आहे. अशा सभा आणि मोर्चामधून काही साध्य होणार नाही असंही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलंय.
दुकानांवर केली दगडफेक :वक्फ बोर्डाचा कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी करत हजारो तरुणांना सोबत घेत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौक दरम्यान जाताना मधला मारुती परिसरात काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. या मोर्चामध्ये भाजपा आमदार नितेश राणे, भाजपा आमदार विजयकुमार देशमुख, भाजपा आमदार टी राजा सिंह उपस्थित होते. मोर्चामध्ये असे मातब्बर लोकप्रतिनिधी असताना, अशी दगडफेक केली जाते हे योग्य नव्हे. पोलीस तपास सुरू असून कारवाई करतील असा विश्वास सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला आहे.
हिंदू जन आक्रोश सभा आयोजित : सोलापुरातील एका धार्मिक स्थळावरून वाद सुरू झाला होता. हिंदू संघटनांनी एकत्रित येत धार्मिक स्थळाजवळ शनिवारी सायंकाळी हिंदू जन आक्रोश सभा आयोजित केली होती. येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यापूर्वी अशा अशांत घटना घडू नये असं आवाहन शिंदेंनी केलं आहे.
हेही वाचा -
- प्रभू रामचंद्राचा हक्क भाजपावाले घेऊ शकणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे
- मीसुद्धा स्कॉलरशिपचा लाभ घेतला, नंतर आरक्षणाचा लाभ सोडला - सुशीलकुमार शिंदे
- Sushilkumar Shinde Mobile Stolen : मी मोबाईल चोरला नाही; फक्त उचलून बाजूला ठेवला, आरोपीने केला पोलिसांकडे खुलासा